Forgot your password?
header1 header2 header3 header4 header5 header6

एम एल डी सी अल्युमनी असोसिएशनतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी गझल गायन स्पर्धा


marathi gazal gayan spardhaएम एल डी सी अलुम्नी असोसिएशनतर्फे मुंबई विश्व विद्यालयाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच मराठी गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेची नियमावली खालील प्रमाणे.

१. स्पर्धा फक्त मुंबई विश्व विद्यालयाशी सलंग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.

२. गझल सादरीकरण एकल स्वरूपाचे असून ,कोणत्याही महाविद्यालयातून जास्तीत जास्त ५ विद्यार्थी भाग घेऊ शकतील.

३ . गझल सादरीकरण कालावधी कमीत कमी ५ मिनिटे व जास्तीत जास्त ७ मिनिटे असेल

४. सादरी करणा साठी तबला आणि संवादिनी (हार्मोनियम) या वाद्यांची सोय वादकांसह आयोजकांतर्फे केली जाईल. स्पर्धकांनी अन्य कोणतेही वाद्य तसेच वादक साथीदार आणू नयेत.

५. प्रथम तीन विजेत्याना चषक आणि रोख पारितोषिक तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.

६. या पांच पारितोषिक विजेत्या कलाकारांना, रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गझल गायन बंधनकारक आहे.

७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्वांना बंधनकारक असेल.

८. महाविद्यालयांनी प्रमाणित केलेल्या विद्यार्थ्यांनीच २० जानेवारी २०१८ पर्यंत म ल डहाणूकर महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे

९. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क नाही, पण प्रवेश नोंदणी करते वेळी रुपये दोनशे फक्त अनामत म्हणून भरणे आवश्यक आहे. स्पर्धेत सादरीकरण झाल्यावर हि रक्कम त्वरित परत दिली जाईल.

१०. स्पर्धा शनिवार दिनांक ०३/०२/२०१८ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून म ल डहाणूकर महाविद्यालय येथे सुरु होईल.

११. सर्व स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता आपली उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धंकांना दिलेल्या क्रमांकावरच सादरीकरण करावे लागेल.

रवींद्र ढवळे
कार्यवाह
९९२०५७२९७४

मिलिंद बागुल
खजिनदार/स्पर्धा संयोजक
८०९७०००६२५